"नित्य नूतन हिंडावे, उदंड देशाटन करावे" हा समर्थसंदेश मान्य करायचा, तर ज्या भागात प्रवासाला जायचे, त्या परिसराची तपशीलवार माहिती हवी. आपला महाराष्ट्र अशा पाहण्याजोग्या ठिकाणांनी समृद्ध आहे.
बलाढ्य किल्ले , पुरातन गढ्या, प्राचीन मंदिरे, खासा खानदेश अनं आकर्षक कोकण यांची माहिती घेऊन मी तुमच्या पुढे माझी भटकंती सदर करी इच्छितो.
काही पाऊलवाटा नव्या तर काही जुन्या.....
काही नाविण्याने उमगलेल्या तर काही चुकलेल्या.....
काही अज्ञात तर काही दुर्लक्षित....
काही जतन केलेल्या तर काही विस्मृतीत...
खुणावीत आहेत मला या सगळ्या पाऊलवाटा......
अशाच काही पाऊलवाटेंवर मी उमटवलेल्या माझ्या पाऊलखुणा तुमच्या पुढे सदर करीत आहे....
No comments:
Post a Comment