किल्ले पुरंदर-वज्रगड
जिल्हा: पुणे
तालुका: वेल्हा
डोंगर रांग: भुलेश्वर
श्रेणी: सोपी
उंची: १५०० मी.
पुण्या जवळ सासवड नावाचा गाव आहे. या सासवड जवळ प्रेक्षणीय
ठिकाण म्हणजे पुरंदर. सिंहगड पासून निघालेली डोंगररांग पंधरा ते वीस कि.मी. आहे. या डोंगर रांगेतच कात्रज, बापदेव, दिवे, बोर हे घाट आहेत. बापदेव घाटा जवळ या डोंगररांगे पासून दक्षिणोत्तर जाणारी शाखा आहे आणि तिलाच चार-सहा कि.मी. वर एका पूर्व-पश्चिम डोंगररांगेची शाखा फुटली आहे. या डोंगररांगेतच पुरंदर आणि वज्रगड हे दोन किल्ले आहेत.

पुरंदर किल्ला आता एन.सी.सी.च्या ताब्यात असल्यामुले गडाच्या माचीवर दोन सुरक्षा रक्षक असतात. त्यांच्या परवानगीने गडावर फिरण्याची मुभा मिळते. या दरवाजातून आपण उजव्या हातास चालू लागल्यावर आपणास समोर दिसतो, रणझुंजार मुरारबाजी देशपांडे यांचा आवेशपूर्ण पुतळा. या पुतळ्या पुढेच आहे पद्मावती तलाव. हा सर्व परिसर डोळ्याखाली घालून आपण परत बिनी दरवाजा परयंत यायचा. येथून सरळ जाणार्या पक्क्या रस्त्याने पुढे पुरंदरचा अधिपती असलेल्या पुरंदरेश्वर महादेवाचे छोटे खाणी सुंदर मंदिर लागते. असे म्हणतात की या मंदिरातील शिवलिंग प्रत्यक्ष इंद्राने स्थापलेले आहे. आपण या देवळाच्या मागच्याच बाजूने जाणाऱ्या पायवाटेने बालेकिल्ल्याला भिडायचं. वीस मिनिटात तटबंदीने सुसज्य अशा सरदरवाज्यात येऊन पोहचतो.

जाण्यायेण्याच्या वाटा:
पुण्याहून ३० की.मी. अंतरावर असणाऱ्या सासवड या गावी यावे. सासवड पासून नारायणपूर या गावात जाणारा फाटा फुटतो. हे अंतर १२ की.मी. आहे. यासाठी एस.टी. सेवा आणि खाजगी जीप सेवा आहे. नारायान्पेर पासून गडावर जाण्यास दोन वाटा आहे. एक म्हणजे गडाची वाट.ही वाट गडाच्या दरवाजापर्यत जाते. दुसरी वाट ही पायवाट असूह सरळसोट किल्ल्यावर चढते.

nice work kaustubh....keep it up n keep us updated too.....it was an immense pleasure trekkin wit u to purander...my 1st ever trek that too it was rockin n worth rememberin.....waitin for d next trek....plan it soon.....:)
ReplyDeleteare nice yaar
ReplyDeleteme kela bhuleshware
http://swachandbhatkanti.blogspot.com/2011/03/blog-post.html?zx=51adb743fef7383e