Popular Posts

Tuesday, March 22, 2011

Janjira Fort

शिवरायांचे अपुरे स्वप्नं, किल्ले जंजिरा 

१५६७ ते १५७१ या काळात आत्ताचा जंजिरा या पाणकोटाचे मूळ बाधकाम झाले व नाव किल्ले महरूब ठेवण्यात आले. मराठयांनी जवळ जवळ बारा वेळा झटापट करून हा जलदुर्गांचा राजा ताब्यात आणण्याचा प्रयत्न केला.मात्र दरवेळी अपयश आले.
छत्रपती शिवाजी महाराजान्च्या १६४८-१६८० या ३२-३३ वर्षाच्या सोनेरी कारकिर्दीत अनेक जय पराजयाचे चढ उतार अपनाव्स पाहायला मिळतात.
राज्यविस्ताराच्या व राज्यरक्षणाच्या दृष्टीने राज्यांचे लक्ष कोकण किनारपट्टी  कडे गेले.शिवरायांनी ही किनारपट्टी बळकट करण्यासाठी नवे जलदुर्ग बांधले व सुसज्य आरमाराची उभारणी केली.या त्यांच्या उद्योगात अडथळा होता तो जंजिऱ्याच्या सिद्दीचा, एका बलाढ्य जाल्दुर्गाच्या अधिपतीचा अगदी शिवरायांच्या शब्दात सांगायचे झाले तर, "जैसा घरास उंदीर, तैसाच राज्यास सिद्दी आहे."





जंजिरा किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार बाजूच्या दोन प्रचंड बांधणीच्या बुरुजांमध्ये लपविल्यामूळे त्याच्या समोर गेल्याशिवाय आपणास ते दिसत नाही.प्रवेश द्वारात उभे राहतास समोरच असणारे गडाचे बुलंद महाद्वार आपले स्वागत करते.
यांच्या दोन्ही हातास दोन उठावदार शिल्पे आहेत.एका वाघाने आपल्या चारही पायात हत्ती पकडले आहे.असे हे शिल्पं किल्ल्याचे महत्व दर्शवते.सध्या जंजिरा किल्ल्यावर मध्य भागी राजवाडा, दोन तलाव,मशीद,सिद्दी घराण्यातील कबरी असे अवशेष आहेत.








नगारखाण्याच्या वास्तूत द्वाजास्तंभ जवळ कलाल बांगडी, चावरी व लांडा कासम या नावाच्या पंच धातूच्या तीन प्रचंड मोठ्या तोफा आहेत.तसेच किल्ल्याला २४ बूरुजा आहेत.यातील दर्या दरवाजा फार सुरेख आहे.असा हा जंजिरा किल्ला पाहिल्यानंतर शिवरायांचे अपूर्ण राहिलेले स्वप्नं "याचि देही याचि डोळा" पाहिल्याचे समाधान वाटते.

जाण्यायेण्याच्या वाटा:
जंजिरा किल्ल्यास भेट देण्यासाठी आपण प्रथम रेगड जिल्यातील अलीबागच्या दक्षिणेस ४८ कि.मी. वर असणारे मुरुड हे तालुक्याचे गाव गाठावे लागते.मुंबई-अलिबाग मार्गे मुरुड हे गाव १४८ कि.मी.आहे.पुणे अगर दक्षिण महाराष्ट्रातून येणाऱ्या दुर्गप्रेमींनी प्रथम रोह हे शहर गाठावे. रोह्याच्या एस.टी. स्थानकापासून प्रत्येक तासाला एक बस मुरुड गावास जाते.मुरुड पासून दोन कि.मी.वर राजपुरी गाव आहे.राज्पुरीतून छोट्या बोटीनं जंजिरा किल्ल्यास जाण्यास बोट आहे.जंजिरा जल वाहतूक सोसायटी तर्फे ही वाहतूक केली जाते. 


Friday, March 18, 2011

Purandar Killa

किल्ले पुरंदर-वज्रगड 

जिल्हा: पुणे
तालुका: वेल्हा
डोंगर रांग: भुलेश्वर
श्रेणी: सोपी
उंची: १५०० मी.

 पुण्या जवळ सासवड नावाचा गाव आहे. या सासवड जवळ प्रेक्षणीय
ठिकाण म्हणजे पुरंदर. सिंहगड पासून निघालेली डोंगररांग पंधरा ते वीस कि.मी. आहे. या डोंगर रांगेतच कात्रज, बापदेव, दिवे, बोर हे घाट आहेत. बापदेव घाटा जवळ या डोंगररांगे पासून दक्षिणोत्तर जाणारी शाखा आहे आणि तिलाच चार-सहा कि.मी. वर एका पूर्व-पश्चिम डोंगररांगेची शाखा फुटली आहे. या डोंगररांगेतच पुरंदर आणि वज्रगड हे दोन किल्ले आहेत. 


पुरंदर हा यादवकालीन प्राचीन गड आहे. या गडाने आजवर बहामनी, निजामशाही, आदिलशाही, शिवशाही आणि पेशवाई बघितली. शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र संभाजीराजे यांचा जन्म इथेच झाला. पेशवाई सवाई माधवराव यांचा जन्म इथेच झाला.


पुरंदर किल्ला आता एन.सी.सी.च्या ताब्यात असल्यामुले गडाच्या माचीवर दोन सुरक्षा रक्षक असतात. त्यांच्या परवानगीने गडावर फिरण्याची मुभा मिळते. या दरवाजातून आपण उजव्या हातास चालू लागल्यावर आपणास समोर दिसतो, रणझुंजार मुरारबाजी देशपांडे यांचा आवेशपूर्ण पुतळा. या पुतळ्या पुढेच आहे पद्मावती तलाव. हा सर्व परिसर डोळ्याखाली घालून आपण परत बिनी दरवाजा परयंत यायचा. येथून सरळ जाणार्या पक्क्या रस्त्याने पुढे पुरंदरचा अधिपती असलेल्या पुरंदरेश्वर महादेवाचे छोटे खाणी सुंदर मंदिर लागते. असे म्हणतात की या मंदिरातील शिवलिंग प्रत्यक्ष  इंद्राने स्थापलेले आहे. आपण या देवळाच्या मागच्याच बाजूने जाणाऱ्या पायवाटेने बालेकिल्ल्याला भिडायचं. वीस मिनिटात तटबंदीने सुसज्य अशा सरदरवाज्यात येऊन पोहचतो.


गडावर राजवाडा, पेशावांचा वाडा, दारूगोळा ठेवण्याची जागा, धान्य ठेवण्याची कोठी, तेल-तुपाची टाकी, तोफखाना, जामदारखाना, पहारे, चौक्या अशा अनेक गोष्टी भाग्नावशेषांच्या स्वरूपात बघता येतात. गडावर केदारेश्वराच्या मंदिरा सोबतच हनुमंत, म्हसोबा, नारायण, गणेश मंदिर, पद्मावती, लक्ष्मी अशी काही मंदिरे आहेत. गडावर शेंदऱ्या बुरुज, हत्ती बुरुज, कोकण्या बुरुज, फत्ते बुरुज असे भरभक्कम बुरुज आहेत. 




जाण्यायेण्याच्या वाटा:

पुण्याहून ३० की.मी. अंतरावर असणाऱ्या सासवड या गावी यावे. सासवड पासून नारायणपूर या गावात जाणारा फाटा फुटतो. हे अंतर १२ की.मी. आहे. यासाठी एस.टी. सेवा आणि खाजगी जीप सेवा आहे. नारायान्पेर पासून गडावर जाण्यास दोन वाटा आहे. एक म्हणजे गडाची वाट.ही वाट गडाच्या दरवाजापर्यत जाते. दुसरी वाट ही पायवाट असूह सरळसोट किल्ल्यावर चढते.












 

 























































"नित्य नूतन हिंडावे, उदंड देशाटन करावे"  हा समर्थसंदेश मान्य करायचा, तर ज्या भागात प्रवासाला जायचे, त्या परिसराची तपशीलवार माहिती हवी. आपला महाराष्ट्र अशा पाहण्याजोग्या ठिकाणांनी समृद्ध आहे. 
बलाढ्य किल्ले , पुरातन गढ्या, प्राचीन मंदिरे, खासा खानदेश  अनं आकर्षक कोकण यांची माहिती घेऊन मी तुमच्या पुढे माझी भटकंती सदर करी इच्छितो.

     
     काही पाऊलवाटा नव्या तर काही जुन्या.....
     काही नाविण्याने उमगलेल्या  तर काही चुकलेल्या.....
     काही अज्ञात तर काही दुर्लक्षित....
     काही जतन केलेल्या तर काही विस्मृतीत...
     खुणावीत आहेत मला या सगळ्या पाऊलवाटा......   












अशाच काही पाऊलवाटेंवर मी उमटवलेल्या  माझ्या पाऊलखुणा तुमच्या पुढे सदर करीत आहे....

Wednesday, March 16, 2011



नमस्कार,
माझा पहिला पोस्ट..........खूप सांगायचं खूप बोलायचं आहे..........सुरुवात कुठून करू हेच सुचत नाही.......
श्रीचं  नाव घेऊन सुरुवात करतो........

ह्या  ब्लॉग मधून मला तुम्हाला मी केलेल्या भटकंतीची माहिती सांगायची आहे. माझा छंदातून, तुम्हाला आपल्या गौरवशाली इतिहासाची, ऐतिहासिक किल्लांशी, पुरातन मंदिरांशी निजरूप करायचा आहे..........
हीच  एक प्रामाणिक भावना घेऊन मी हा ब्लोग सुरु केला आहे आणि मला खात्री आहे तुम्ही मला माझ्या या कार्यात भरगोस प्रतिसाद द्याल......
लवकरच भेटू याच ब्लॉग वर एका वैशिष्ठपूर्ण आणि देखण्या  ठिकाणाची माहिती घेऊन.....